भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा सेंच्युरियन येथे होत आहे मात्र या सामन्यावर पाऊसाचे सावट देखील आहे.
दुपारी २ वाजता ह्या सामन्याला सुरवात झाली असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघातील प्रमुख खेळाडू पहिल्यांदाच एकत्र मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याद्वारे आपले कसोटी पदार्पण करत आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले . मात्र सत्राच्या शेवटी भारतीय फलंदाजांनी डाव सावरत संघाला दिलासा दिल्याचे चित्र समोर आले आहे. भारताची अवस्था 3 बाद 24 धावा अशी झाल्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांच्या या भागीदारीमुळे भारत शतकाच्या जवळ पोहचला आहे.