राजस्थानमध्ये उद्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. सुमारे 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात 12 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री असू शकतात. अशी सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.
या मंत्रिमंडळात बाबा बालकनाथ यांच्यासह शैलेश सिंह, जवाहर सिंग बेदम ,महंत प्रतापपुरी यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी नुकतीच दिल्लीमध्ये या संदर्भात भाजप अध्यक्ष नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.