काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेची दुसरी आवृत्ती ‘भारत न्याय यात्रा’ जानेवारीत सुरु होणार आहे. ही ६,००० किमी अंतराची यात्रा असणार आहे.
पहिल्या यात्रेचा अनेक राज्यांतून प्रवास झाल्याने राहुल गांधींना त्याचा बऱ्यांपॆकी राजकीय फायदाही झाला होता.त्यामुळं आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा काँग्रेसला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर किती फायदा मिळतो हे पहाणं महत्वाचे ठरणार आहे.
मणिपुरपासून सुरु होणारी ही यात्रा नागालैंड, असम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, यूपी, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र मार्गे मुंबईत येणार आहे. काही ठिकाणी बसने तर काही ठिकाणी पायी प्रवास होईल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘भारत न्याय यात्रेला’ हिरवा झेंडा दाखवतील.