महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मंगळवारी कोविड- १९ चे ३७ नवे रुग्ण सापडले. यासह राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली. तर, ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. . राज्यात कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. मात्र महत्त्वाचे म्हणजे, गेल्या २४ तासात कोविडचा नवा व्हेरिएंट जेएन १ च्या संपर्कात आलेला कोणताही रुग्ण आढळला नाही.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोविड जेएन १ व्हेरिएंट संक्रमित रुग्णांची संख्या १० वर पोहोचली असून यापैकी ठाण्यात पाच, पुणे महापालिका क्षेत्रात दोन, पुणे ग्रामीण, अकोल महापालिका आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एक- एक रुग्ण आढळून आला आहे. .