हवामान विभागाच्या माहितीनुसार वर्षअखेरीस राज्याच्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे. किमान तापमानात काही अंशांची वाढ नोंदवण्यात येत असली तरीही राज्यात गारठा मात्र टिकून राहणार आहे.
एकीकडे देशासह राज्यातील तापमानातही मोठी घट दिसत असली तरी , दुसरीकडे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. वर्षअखेर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात धुळे ,परभणी आणि निफाडया भागांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या भागांमध्ये रात्रीच्या तापमानात मोठ्या फरकाने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 10 अंशाखाली राहण्याची शक्यता आहे. तर कोकणात देखील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.