केंद्र सरकारने बुधवारी (२७ डिसेंबर) मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर-मसरत आलम गटावर (एमएलजेके-एमए) बंदी घातली आहे. . सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत केली असून या संघटनेचे सदस्य जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते तसेच,दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप या संघटनेवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी या गटाचे सदस्य दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना भडकावतात.असा आरोप अमित शाह यांनी केला आहे.
आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात कोणीही कृत्य केल्यास त्यांना सोडले जाणार नाही आणि कायद्याच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे लागेल. असा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा स्पष्ट संदेश असल्याचे अमित शाह यांनी सांगितले आहे.