भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाजी केएल राहुलने झुंजार शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीच्या जोरावरच भारताने सेंच्युरियनच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर २४५ धावांपर्यंत मजल मारलेली दिसून आली आहे. आपल्या कसोटी सामन्यांच्या करियरमधली सर्वोत्तम इनिंग करत त्याने १३३ चेंडूंचा सामना करत १०१ धावा केल्या आहेत.
कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अडचणीत आला असताना राहुलने संघाला तर सावरलेच पण त्याचबरोबर राहुलने आफ्रिकन गोलंदाजांचा मारा निष्प्रभ करत झुंझार खेळी साकारली. राहुलच्या शतकाने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने सचिन तेंडुलकर आणि कोहलीचा विक्रम मोडला आहे.
सेंच्युरियनमध्ये कसोटी शतक झळकावणारा राहुल हा तिसरा खेळाडू आहे. येथे सचिन आणि कोहलीने प्रत्येकी एक शतक झळकावले होते. मात्र केएल राहुल हा सेंच्युरियनवर दोन शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सेंच्युरियनवर पहिले शतक हे २०२१ मध्ये ठोकले होते. त्यावेळी त्याने १२३ धावांची दमदार खेळी केली होती. आता मात्र याचबरोबर केएल राहुलने अजून एक माईल स्टोन पार केला आहे. सेना देशात शतक ठोकणारा तो ऋषभ पंतनंतर दुसरा विकेटकिपर ठरला आहे.