लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोठे पाऊल उचलले असून भारताने पाकिस्तानकडे हाफिजच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
पाकिस्तानी मीडिया इस्लामाबाद पोस्टनेही हा दावा केला आहे.इंडिया टुडेच्या बातमीनुसार,पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारत सरकारकडून अधिकृत विनंती प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि दहशतवादी गटांना फंडिंग प्रकरणात हाफिजवर आरोप आहेत तसेच विशेष म्हणजे, दहशतवादी हाफिज सईदच्या नवीन राजकीय आघाडीने 8 फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाकिस्तानातील बहुतेक राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत.
लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि मुंबईतील दहशतवादी संघटनेचा मास्टरमाईंड हाफिज सईद दहशतवादासाठी अर्थपुरवठा करतो,सध्या तो पाकिस्तान मधल्या तुरुंगात आहे.