प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी इथे सुरु असलेल्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. यासाठी या नगरीला १६ हजार कोटींच्या विकास कामांचे पॅकेज मिळणार आहे.तसेच रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे
पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षेच्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अयोध्येमध्ये ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. बीएससी आणि स्थानिक पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहेत. अयोध्येतील सर्व रस्त्यांवर मोठ्या वाहनांसाठी बंदी करण्यात आली आहे.
यामध्ये रामजन्मभूमी मंदिराशी संबंधित विकासकामांवर विशेषतः लक्ष केंद्रीत केले जाणार असून चार प्रमुख मार्गांचे लोकार्पणही होणार आहे.