जनता दल युनायटेड या पक्षाचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी अखेर आपल्यापदाचा राजीनामा दिला असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पुन्हा पक्षाची कमान सोपवण्यात आली आहे.
याआधी काही दिवस लल्लन सिंह यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आज अखेरीस लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांना बाजूला सारून आता नितीश कुमार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.
नितीश कुमार यांचा इंडिया आघाडीमध्ये जायचा निर्णय यामुळे नाराज असलेले जेडीयूतील अनेक जण पुन्हा एनडीएच्या मार्गावर जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितलं जात आहे.लल्लन सिंह यांच्याही राजीनाम्यामागे हेच कारण असावे असे सांगितले जात आहे.