पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचा लाडका आणि संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मास्टर मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
कंदाहारमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मारला गेल्याचे वृत्त सोशल मीडियावरून पुढे आले असले तरी अजून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कंधारचा अपहरणकर्ता मसूद अझहर, सकाळी ५ वाजता अज्ञातांनी केलेल्या बॉम्बस्फोटात ठार झाला आहे . यावेळी तो भावलपूर मशिदीतून परत जात होता.
जोपर्यंत आपण भारताला संपवत नाही तोपर्यंत मुस्लिम शांत बसू शकत नाही हे सांगणे माझे कर्तव्य आहे.असे वक्तव्य जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर अल्वीने भारतातील तुरुंगातून सुटल्यानंतर कराचीमध्ये 10 हजार लोकांसमोर केले होते.गेल्या काही महिन्यांपासून गेल्या काही आठवड्यात भारताला हवे असलेले अनेक अतिरेकी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या गोळीबारात लागोपाठ ठार झाले आहेत.ज्यामध्ये मसूदच्या साथीदारांचाही समावेश आहे.
भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेल्या मसूदला UNSC मध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे .