अयोध्येतल्या राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा होणार आहे.सगळ्या रामभक्तांचे लक्ष या ऐतिहासिक घटनेकडे लागले आहे.रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहेत .प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
म्हैसूरच्या अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची ही मूर्ती अंतिमतः निवडण्यात आली आहे.
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी काही मानके ठरवण्यात आली आहेत. तसेच कर्नाटकमधील श्याम शिला आणि राजस्थानच्या मकराना इथले संगमरवरी दगड त्यांच्या खास वैशिष्ठयांमुळे निवडण्यात आले आहेत.
अरुण योगीराज यांच्या घरात गेल्या पाच पिढ्यांपासून मूर्ती घडवण्याच्या कामाचा वारसा चालत आलेला आहे. अरुण योगीराज यांची फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचे कौतुक केलं आहे
अरुण योगीराज यांनी इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ३० फूट उंचीचा पुतळा साकारला आहे.तसेच केदारनाथ या ठिकाणी आदी शंकराचार्यांचा १२ फूट उंचीचा पुतळाही साकारला आहे. मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्तीही त्यांनी साकारली आहे.मैसूर या ठिकाणीच त्यांच्या हातातून निर्मिलेली हनुमानाची २१ फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे.