Bigg Boss 17 | सध्या ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. हा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहे. तसंच यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या कार्यक्रमाची आणि स्पर्धकांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला नेहमी पाठिंबा देतात, पण आता बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाला प्रेक्षकांनी नाही तर अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) पाठिंबा दिला आहे.
नुकतंच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा टास्क पार पडला. या टास्कवेळी अभिषेक कुमारला अश्रू अनावर झाले होते. कारण अभिषेकच्या मानसिक आरोग्याबद्दल समर्थ जुरेल आणि ईशा मालवीयने थेट नॅशनल टेलिव्हिजनवर मजा घेतली. त्यामुळे अभिषेकला अश्रू अनावर झाले होते. यामुळे अभिषेकला अनेक सेलिब्रिटींना पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखनं देखील अभिषेकला पाठिंबा देत खंत व्यक्त केली आहे.
अभिषेक कुमारला पाठिंबा देण्याबाबतचं एक ट्विट रितेश देशमुखनं केलं आहे. “अभिषेकसाठी खूप वाईट वाटत आहे”, असं रितेशने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर रितेशसोबतच बिग बॉसच्या घरातील एक्स स्पर्धकांनी देखील अभिषेकला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये ऐश्वर्या शर्मानं म्हटलं आहे की, ईशा आणि समर्थ खूप वाईट खेळी खेळत आहेत. एखाद्या व्यक्तीला एवढा त्रास कोणी कसं देऊ शकतं. बिग बॉसने यावर काहीतरी अॅक्शन घ्यायला हवी. तर राजीव अदातियानं म्हटलं आहे की, अभिषेक चिंता करू नको, तू खरचं खूप स्ट्रॉन्ग आहेस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे.
दरम्यान, आता बिग बॉसच्या घरातील नवी कॅप्टन अंकिता लोखंडे बनली आहे. कॅप्टनसीच्या टाक्समध्ये अंकितानं पती विकी जैनला मागे टाकत बाजी मारली आहे. तर बिग बॉसचा हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.