आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यामध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान मोदींनी या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य्यता निधीतून २ लाख रुपयांची तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, ”आसामच्या गोलाघाट येथे झालेल्या दुर्घटनेमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. मृत्यू व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मी संवेदना व्यक्त करतो. तर, जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वोतोपरी मदत करत आहे. मृत पावलेल्या व्यक्तींना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य्यता निधीतून २ लाख रुपयांची तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाईल.”
आसाममध्ये झालेल्या अपघाताच्या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील एक्स वर भावूक पोस्ट शेअर केली आहे. ”आसामच्या गोलाघाटमध्ये झालेल्या रस्ते अपघातामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी मी शोक व्यक्त करते तसेच, जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते.”
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी डेरगाव येथे झालेल्या भीषण बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या कठीण प्रसंगी स्थानिक प्रशासन जखमींना आवश्यक ती सर्व मदत करत आहे असे आसाम मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.