राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये बोलत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त विधानवरून भाजपा चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
या शिबिरामध्ये बोलत असताना ”राम आमचा आहे. राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही सर्व जण आम्हाला शाकाहारी बनवायला जाता, मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो म्हणून आम्ही मटण खातो. हाच आहे रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. ” असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिरामध्ये केले. ”१४ वर्षे जंगलात राहणार व्यक्ती शाकाहारी भोजन शोधायला कुठे जाणार?” असे देखील या शिबिरामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राज्यात नवीन वादाला तोंड फुटले असून, भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे.
या शिबिरामध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाडांनी नवीन वादाला तोंड फोडले. ”कोणी कितीही म्हणो, तरी सत्य हेच आहे की, आपल्याला स्वातंत्र्य फक्त गांधी आणि नेहरूंमुळेच मिळाले आहे. गांधीजींची हत्या १९४७ मध्ये झाली नव्हती. १९३५ मध्ये त्यांच्यावर पहिला हल्ला झाला होता. दुसरा हल्ला १९३८ मध्ये तर तिसरा हल्ला हा १९४२ मध्ये झाला होता.”