दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने तीन समन्स धाडली असली तरी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर झालेले नाहीत.त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने सीएम केजरीवाल यांना गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी तिसरे समन्स जारी केले होते आणि त्यांना 3 जानेवारी रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते मात्र केजरीवाल यांनी ईडीला दिलेल्या उत्तरात तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली परंतु नोटीसला “बेकायदेशीर” म्हणत समन्सच्या तारखेला हजर राहण्यास नकार देत केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ला समन्स पाठवल्यानंतर त्यांच्या आधीच्या उत्तरांना प्रतिसाद न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
आप नेत्यांना जेलमध्ये टाकून आता मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ईडीनं कायदेशीर समन्स पाठवावे .मी कायदेशीर समन्सचेच पालन करेन,असेही केजरीवाल म्हणाले आहेत, विशेष म्हणजे ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत तीनवेळा नोटीस पाठवली आहे. तिन्ही वेळा त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याने ईडी यापुढे काय पाऊल उचलते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ईडीची टीम कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना अटक करू शकते. असे वृत्त समोर येत आहे.