रेडमी ही एक लोकप्रिय मोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवननवीन स्मार्टफोन्स बाजारामध्ये लॉन्च करतच असते. रेडमी कंपनीने भारतामध्ये आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रेडमीने आपला Note 13 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे,. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना FHD+ डिस्प्ले आणि मीडियाटेक चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५००० mAh क्षमतेची बॅटरी देखील मिळणार आहे. तर रेडमी Note 13 5G या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
Redmi Note 13 5G फीचर्स
रेडमी नोट १३ ५जी स्मार्टफोनमध्ये ६०८० ऑक्टा कोअर मीडियाटेक चिपसेटचा सपोर्ट मिळेल. तसेच यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज देखील मिळणार आहे. या फोनचा डिस्प्ले ६.६७ इंचाचा असेल. त्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे संरक्षण देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात १०८ मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूट देखील मिळणार आहे. तसेच ग्राहकांना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ३३ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
किंमत
Note 13 5G हा स्मार्टफोन ६/१२८ जीबी, ८/२५६ जीबी आणि १२/२५६ जीबी या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यांची अनुक्रमे किंमत १७,९९९ , १९,९९९ आणि २१,९९९ रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन १० जानेवारीपासून Amazon आणि कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. फोन खरेदी करताना ICICI बँकेच्या कार्डवर १,००० रुपयांचा डिस्काउंट देखील मिळणार आहे.