हे मंदिर पारंपरिक नागर शैलीत तयार होत आहे.
मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असेल.
हे मंदिर तीन मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 द्वार असतील.
मुख्य गर्भगृहात प्रभू श्रीरामाचे बालरूप (श्रीरामलला सरकारची मूर्ती) तसेच तळमजल्यावर श्रीराम दरबार असेल.
मंदिरात 5 मंडप असतील – नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप व कीर्तन मंडप.
खांब व भिंतींमध्ये देव-देवतांच्या मूर्त्या कोरण्यात येत आहेत.
मंदिरात प्रवेश पूर्व दिशेने, 32 पायऱ्या चढून सिंहद्वाराने होईल.
दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प व लिफ्टची व्यवस्था असेल.
मंदिराच्या चारी बाजूने आयताकार तटबंदी असेल.. चारही दिशांनी याची लांबी एकूण 732 मीटर आणि रूंदी 14 फूट असेल.
तटबंदीच्या चारही कोपऱ्यात सूर्यदेव, माता भगवती, गणपती व भगवान शिवाला समर्पित असलेले चार मंदिर बांधण्यात येतील. उत्तर बाजूला माता अन्नपूर्णा व दक्षिण बाजूला हनुमानाचे मंदिर असेल.
मंदिराच्या जवळच पौराणिक काळातील सीताकूप असेल.
मंदिर परिसरातील प्रस्तावित अन्य मंदिरे- महर्षी वाल्मीकि, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी व ऋषिपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील.
नैऋत्य भागात नवरत्न कुबेर टेकडीवर भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून तेथए जटायूची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.
मंदिरात लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. जमिनीच्या वर किंचितही काँक्रिट नाही. 15. मंदिराच्या खाली 14 मीटर जाड रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट (RCC) टाकण्यात आले आहे. याला कृत्रिम शिळेचे रूप देण्यात आले आहे.
जमिनीच्या ओलीपासून मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी 21 फूट उंच पाया ग्रॅनाईटने बनविण्यात आला आहे.
मंदिर परिसरात स्वतंत्ररीत्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलप्रक्रिया प्रकल्प, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था तसेच स्वतंत्र पॉवर स्टेशन तयार करण्यात आले आहे जेणेकरून बाहेरील साधनांवर अवलंबित्व कमीत कमी राहील.
पंचवीस हजाराची क्षमता असलेले एक दर्शनार्थी सुविधा केंद्र (Pilgrims Facility Centre) बांधण्यात येत आहे. येथे भाविकांचे सामान ठेवण्यासाठी लॉकर आणि वैद्यकीय सुविधा असेल.
मंदिर परिसरात स्नानागार, शौचालय, वॉश बेसिन व खुले नळ इत्यादींची सोय असेल.
. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार व स्वदेशी तंत्रज्ञानाने करण्यात येत आहे. पर्यावरण व पाण्याची बचत यावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूण 70 एकर क्षेत्रातील 70% भाग सदाहरित असेल.
सौजन्य -विश्व संवाद केंद्र