आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते.यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते. दरम्यान, त्यांना महासंचालकपदी किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार या बाबत संभ्रम होता. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत.त्यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते.
रश्मी शुक्ला या पुणे पोलिस आयुक्त असतांना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते हे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करत चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात हा खटला दाखल झाल्यानंतर त्यांना दिलासा देत आरोपमुक्त करण्यात आले होते.