उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला असून तब्बल 200 तोफगोळे डागल्याची माहिती समोर आली आहे मात्र हे तोफगोळे दक्षिण कोरियाच्या हद्दीत पडलेले नाहीत त्यामुळे अजुनही दोन्ही देशांच्या सीमाभागात गोंधळाचे वातावरण आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं दक्षिणेकडील येओनप्योंग बेटावर 200 तोफगोळे डागले. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या 2 हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना दिल्या असून या कारवाईचा निषेध केला आहे.
दोन्ही देशांमधील वास्तविक सागरी सीमा नॉर्दर्न लिमिट लाइन (NLL) च्या उत्तरेला हे तोफगोळे पडले. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे खात्रीशीर वृत्त अद्याप समोर आलेले नाही.ही चिथावणीखोर कृती असून दक्षिण कोरियाचे सैन्य किनाऱ्यावर उत्तरेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. असे प्रवक्ते ली सुंग-जून यांनी सांगितले आहे.
उत्तर कोरियाने केलेल्या गोळीबारामुळे दक्षिणेत कोणतेही नागरी किंवा लष्करी नुकसान झाले नसल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने एका वार्ताहर परिषदेत सांगितले आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनं म्हटले आहे की, बफर झोनमध्ये तोफगोळे डागत उत्तर कोरियाने 2018 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन केले आहे. दरम्यान, गेल्या काही तासांमध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.