राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली आहे.आज सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांमध्ये ईडीकडून तपास करण्यात येत आहे. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही.
शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.
यापूर्वी बारामती अॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती.यावेळी ७२ तासांत प्लँट बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगितीही मिळवली होती.याप्रकरणी रोहित पवार यांनी त्यावेळी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या कंपनीत छापेमारी झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. बारामती अॅग्रो कंपनीच्या संबंधित लोकांच्या घरीही छापेमारी सुरु करण्यात आली आहे. रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत.आणि पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी केली जात आहे