श्रीकृष्ण जन्मभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या जागेवर श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून मान्यता देणारी जनहित याचिका करण्यात आली होती. ही जनहित याचिका उच्च नायालयाने फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच न्यायालयाने फेटाळली आहे.
याचिकेमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे हे आधीपासूनच उच्च न्यायालयासमोर असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती प्रीतिनकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने जनहित याचिका फेटाळून लावली होती.