पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये 1,156 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केले. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपचे समुद्रकिनारे आणि निसर्ग मनाला अत्यंत भावणारे व निखळ शांतता देणारे आहेत. येथील सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला काही वेळ व्यथित केला. यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर खास फोटोशूट देखील केले आहे. त्यानंतर त्यांनी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारला व वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील लुटला. याचे फोटो देखील मोदींनी ‘एक्स’ वर शेअर केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी समुद्रात डुबकी लगावली तसेच स्नॉर्किंगचा देखील आनंद लुटला आहे.यावेळी त्यांनी समुद्राखाली असलेले जग देखील अनुभवले. यावेळी त्यांनी आपल्या फोटोसह एक पोस्ट देखील शेअर केली आहे. लक्षद्वीपमधील निसर्गसौंदर्यासोबतच येथील शांतता देखील अत्यंत मनमोहक, मंत्रमुग्ध करणारी आहे. १४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करायचे याचे चिंतन, मनन करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. तसेच येथील समुद्रकिनाऱ्यावर पहाटेच्या वेळेस चालणे देखील निखळ आनंद देणारे होते.