रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रिलायन्स जिओने ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये आज ५ जी नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळत असतात.
रिलायन्स जिओकडे १४८ रुपयांचा एक प्लॅन आहे, ज्यामध्ये ग्राहकांना ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळणार आहे. चक्क एक दोन नव्हे तर १२ ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश या प्लॅनमध्ये करण्यात आला आहे. रिलायन्स जिओचा १४८ रुपयांचा प्लॅन हा जिओ टीव्ही प्रीमियमसह सादर करण्यात आला आहे. एका लॉग इन मध्येच ग्राहकांना हे प्लॅटफॉर्म वापरता येणार आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला १० जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा मिळणार फायदा?
रिलायन्स जिओच्या १४८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला सोनी लिव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम, Lionsgate प्ले, डिस्कव्हरी प्लस, SunNXT, Kanchha Lannka, प्लॅनेट मराठी, चौपाल, DocuBay, एपिक ऑन, आणि Hoichoi या प्लॅटफॉर्मचा फायदा मिळणार आहे.