राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ७२ रुग्णांची नोंद झाली आहे,राज्यात जेएन.१ चे गुरुवारी पुण्यात ७२ आणि नांदेड २, सोलापूर १, नागपूर १ असे ७८ नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.
राज्यातील जेएन.१ च्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक पुण्यात आहेत. पुण्यातील ही रुग्णसंख्या ९१ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ५ रुग्ण असून, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नांदेड २, कोल्हापूर १, अकोला १, सिंधुदुर्ग १, नाशिक १, सातारा १, सोलापूर १, नागपूर १ अशी रुग्णसंख्या आहे.
दरम्यान, पुण्यात गुरुवारी करोनाचे १५ नवीन रुग्ण आढळले.राज्यात १ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीतील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्याचा अहवाल ३ जानेवारीला मिळाला असून, त्यात ७८ जणांना जेएन.१ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. असे पुणे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. आर.बी.पवार यांनी सांगितले