समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणे, त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याचे सुविचार मंचाचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदीर येथे आयोजित सुविचार मंच गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर,आमदार दिलीप बोरसे, पद्मश्री सुरेश वाडकर, ॲड.नितिन ठाकरे, साहित्यिक दत्ता पाटील, डॉ शेफाली भुजबळ, , कलावंत गौरव चोपडा, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, सुविचार मंचचे ॲड.रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह इतर पुरस्कार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Tags: NULL