कोल्हापूरमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पन्हाळा किल्ल्याजवळ असलेल्या पावनगडावर पोलिसांनी अनधिकृत मदरसा हटविला आहे. पोलिसांनी या अतिक्रमणावर कारवाई केली आहे. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी मध्यरात्री २ वाजता ही कारवाई सुरु केली. मध्यरात्री सुरु करण्यात आलेली कारवाई तब्बल सात तासांनी संपली आहे. गडावर असलेला अनधिकृत मदरसा यावेळी हटविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आणि इतर प्रमुख पोलीस अधिकारी गडावर तळ ठोकून आहेत. या कारवाईबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असून, गडावर जाण्याच्या मार्गवर देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गडावर जाण्याचे मार्ग सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. गडावर असलेले अनधिकृत मदरसे हटविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पावनगडाचे इतिहासात महत्वाचे स्थान आहे. पन्हाळा किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर पावनगड आहे. पन्हाळा किल्याचा संरक्षक गड म्हणून पावनगडाची ओळख आहे. शत्रूला चकवा देण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र या गडावर काही अनधिकृत मदरसा असल्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.