अरबी समुद्रामध्ये सोमालिया किनाऱ्याजवळ ‘एमव्ही लिली नॉरफॉक’ या जहाजाचे अपहरण करण्यात आले होते. या जहाजावर १५ भारतीय मेंबर्स होते. ५ हत्यारबंद लोकांनी या जहाजाचे अपहरण केले होते. यानंतर भारतीय नौदलाने आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला यांच्या रक्षणासाठी रवाना केले होते. भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडोनी या जहाजांमधून १५ भारतीयांसह सर्व २१ क्रू मेम्बर्सना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. याबद्दल, जहाजावरुन वाचवण्यात आलेल्या भारतीय मेंबर्सनी भारतीय नौदलाचे आभार मानले आहेत.
नौदलाने याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये क्रू मेमेंबर्स ”भारत माता की जय” च्या घोषणा देताना व भारतीय नौदलाचे आभार मानताना दिसत आहेत. त्या ऑपरेशनमध्ये वाचलेल्या एका भारतीयाने सांगितले की, ”आम्ही २४ तास अडकून पडलो होतो. भारतीय नौदल आम्हाला वाचवायला आल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला. ”तर आम्हाला ”भारतीय नौदलाचा अभिमान आहे.” असे दुसऱ्या माणसाने सांगितले.
भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडोनी अपहरण झालेल्या एमव्ही लिला नॉरफोक या जहाजामधून १५ भारतीयांसह २१ क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका केली. हत्यारबंद समुद्र चाच्यांनी अपहरण केलेल्या जहाजावर भारतीय नौदलाने एक जलद कारवाई करून सर्वाना सुखरूप बाहेर काढले आहे. ”उत्तर अरबी समुद्रामध्ये एमव्ही लिला नॉरफोकच्या अपहरणाच्या प्रयत्नाला भारतीय नौदलाने जलद प्रतिसाद दिला आहे. जहाजावरील सर्व २१ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.” असे निवदेन भारतीय नौदलाने एक्स वर पोस्ट केले आहे.