राज्यात पुढील ४८ तासांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यातील हवामानामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडीचा प्रभाव देखील वाढू शकतो. कोकणासह राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सर कोसळू शकतात.
पुणे शहरात देखील गेल्या दोन ते चार दिवसांपासून हवामानामध्ये बदल जाणवत आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे पुण्यासह बहुतांश शहरांमध्ये ढगाळ वाटेवरून दिसून येत आहे. तसेच रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये पावसाच्या हलक्या सारी कोसळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये देखील हलक्या सारी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हलके धुके देखील पाहायला मिळू शकते.