लवकर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करणार आहेत. या यात्रेला त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे नाव दिले आहे. मागच्या वेळचा प्रतिसाद पाहता यावेळेस देखील नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळण्याची शक्यता आहे. याचनिमित्ताने काँग्रेस पक्षाने ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या लोगोचे आणि घोषवाक्याचे अनावरण केले आहे. या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत. ‘भारत जोडो न्याय यात्रेचे’ घोषवाक्य व लोगोचे अनावरण केले आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात या कार्यक्रमादरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस प्रभारी जयराम रमेश आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल उपस्थित होते.
‘न्याय का हक मिलने तक’ असा या यात्रेचे घोषवाक्य आहे. ”राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही १४ जानेवारीपासून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु करत आहोत. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ हे देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले आमचे भक्कम पाऊल आहे”, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान, ज्या ठिकाणी जातीय हिंसाचार झाला, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली नाही असा हल्ला खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर चढवला. ”आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगणार आहोत की, आता दुसरा कोणताही पर्याय नाही. आम्ही संसदेत बोलण्याचा व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकाने आम्हाला संधी दिली नाही. इतिहासामध्ये पहिल्यांदाच १४६ खासदारांना निलंबित केले गेले. ते लोकसभेत आले मात्र त्यांनी एकदाही राज्यसभेकडे लक्ष दिले नाही”, असे खर्गे म्हणाले. राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १४ जानेवारीपासून इंफाळ येथून सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये ६,७१३ किमी अंतर पार केले जाणार आहे. यामध्ये १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा क्षेत्रे व ११० जिल्हे कव्हर केले जाणार आहे. ही यात्रा २० ते २१ मार्च दरम्यान मुंबईत समाप्त होणार आहे.