नमस्कार, अशा या श्रीमंत सदगुरूचे मी काही लिहणे म्हणजे सूर्य च्या पुढे काजवाच.
श्रीमहारांज अशा पक्क्या थोर संता पैकी होते. त्यांच्या ठिकाणी जन्मतःच अत्यंत तीब्र अध्यात्मवती होती.श्रीएकनाथ किंवा समर्थ यांच्या प्रमाणे अगदी लहानपणापासूनच आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती.आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मनासारखा सदगुरु भेटल्यावर त्यांनी सांगितले ल्या मागाने जाऊन वयाच्या केवळ 15 वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करुन घेतली.देहबुद्धिमुळा पासुन जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारांत,विचारात आणि उच्चारांतचुकुन देखील मी पणा व माझे पणा दिसायचे नाही हेंच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय.
आपण जो आनंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावें,या एकाच पवित्र प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असतां अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा त्यांना सोसावा लागला तरीदेखील ,शेवटचा श्वास असेतोंपर्यत सर्वानी भगवंताच्या मागि लागावें,म्हणजे च भगवंताचे नाम घ्यावे ,म्हणून त्यांनी प्रयत्न केला.ऐवढे सांगितले तेव्हा आपल्याला समजले असेलच मी कोणाबद्दल लिहणार आहे पुढे..
श्रीमहारांजाचे आजोबा होते लिंगोपंत कुळकर्णी. चांगल्या दिवसात वयाच्या 16/17 वर्षी कुळकर्णी पणांचे काम पाहूं लागले. राधाबाई हे आजीचे नांव होते. आदर्श संसार होता.लिंगोपंत न्याय देताना इतके कुशलतेने समजूतदार आणि नि:पक्षपातीपणे वागत सर्व लोकांना फार प्रिय झाले. लोक त्यांना लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखूं लागले. अखंड “पांडुरंग ,पांडुरंग”असू नामस्मरण करण्याची सवय होती. या प्रापंचिक आणि पारमार्थिक ऐश्वर्या स शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला.पंतांनी “रावजी” हे नांव ठेवले.
लिंगोपंत थकले दर वारी साठी पंढरी ला जाणे अवघड झाले तेव्हा फारच वाईट वाटु लागले. रात्री अंथरुणावर बसल्यावर नित्याच्या संवयीप्रमाणे त्यांनी पांडुरंगाची मुर्ती ध्यानांत आणली थोडया वेळांने झोप लागली. पंरतु पहाटे तीन चारच्या सुमारास एक विलक्षण स्वप्न पडले. पांडुरंग सांगत होता आता तुला येणे होत नाही, तर मीच तुझ्या कडे येतो.मी अमुक ठीकाणी आहे. मला उद्या तु बाहेर काढ.कसे तरी पहाट होऊ दिली आणि गावातील लोकांना घेऊन जाऊन जेथे सागितलं होते तेथून विठोबा रखुमाई बाहेर काढल्या ज्या आजही आपण श्रीक्षैत्र गोंदावले येथे बघतो.
वर्षे मौन धारण केले होते. या सत्पुरुषाने प्रसाद दिला आणि सांगितले “परमात्मा तुमचे कल्याण करील,दोघे ही नामस्मरण करूत जा. रावजी म्हणजे श्रीमहारांजाच्या वडील कुळकर्णी पणाच्या कामामध्ये व्यवस्थित रीतिने लक्ष घालु लागले.पंरतु त्यांचे अंतरंग त्या मध्ये नसल्याने पंतांनी वाढवलेला व्याप हळूहळू कमी झाला. पुढे गीता बाई शी लग्न झाले. त्यांना कामात खुपच मदत करत होत्या.गावातील लोकांना अतिशय मदत करायची लोकांनी तुम्हाला काही तरी दायचे म्हटलं की म्हणत मला काय देता.रामनामाचा जप करा.गोंदावले येथून थोडया अंतरावर संभाजी नावानचे सत्पुरुष राहत होते.
काही दिवसांनी गीता बाईलां दिवस गेले. श्रीराम, श्रीराम असेंच सारखे म्हणत होत्या. आठवा महिन्यात एक बैरागी आला.गीताबाईनां नमस्कार केला त्यांच्या डोळ्यात आनंदाक्षू आले ते बोलले “मेरा लाला तू यहाँ है तेरे दर्शन से मे धन्य हुआ हु.मै अब वापस जाता हुँ.रामेश्र्वर निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला.शके 1766 1845 मधील माघ महिन्यात शुद्ध एकादशी आली विठोबाच्या पुजा झाली,तीर्थ घेतलं सर्वांना फराळ वैगरे झाला. त्यांच्या सांगण्यावरुन सुईण बोलावून आणली.एकादशी रात्री भजन,नामस्मरण चालू होते माघ शुद्ध व्दादशीला पहाटे सूर्यदयाला श्रीगोंदावले येथे जन्म झाला. श्रीमहारांजाचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्या चा कळस होता.
बाळाचे नाव गणपती ठेवले. अतिशय गोड,गुटगुटीत, खुप जावळ असल्याने ते सर्वांना फारच आवडत.आई च्या कडे वर बसून रहावे हीच ईच्छा. ऐकदा खाली ठेवले तर खुपच रडत राहिले. आईचा सहवास नेहमी हवा का असे विचारले तर हो म्हणाले. चार वष्रे झाली. धुळाक्षेंर काढायला शिकवली.आजोबांनी गीते तील एक श्लोक सांगितले तर जसाचा तसा म्हणून दाखवला.मित्रांसोबत भजन,करण्यासाठी गावाबाहेर जात.नाचताना इतके तललीन होउन जातकी इतर मंडळी कौतुकास्पद वाटत होते. एकदा आजोबा म्हणाले बाळ तुला हंडा भर मोहोरा दिल्या तर तु काय करशील तर ताडदिशी उत्तर दिले आंधळे, पांगळे, यांना वाटुन टाके.राजा केला तर लगेचच उत्तर अननछत्र चालविन.मुंज झाली. सावधान म्हणताच विचार करायला लागले काय केले पाहिजे सारे वेद शिकवा,प्रत्येक वेदाला 12 वष्रे लागतात. एवढा वेळ नाही म्हणाले.शाळेत शिकायचे सोडून भजन करीत बसावे. मास्तर रागावून बोलले तर त्यांना च चांगला धडा शिकवला.एकदा आईनै रागावले आणि मारायला काठी आणली तर श्रीमहारांजाच्या मागे पळताना आईच पडली आई पडली म्हणून डोळ्यात पाणी आले.आई तु रामाला नामाची लाखोली वाहते म्हण मी चांगला वागेन .
एक रात्री घरातून निघून एका कपारीत जाऊन जप करीत बसले. घरातील सर्व लोक घाबरले नदी काठी जप एकांतात छान होतो म्हणून गेलो म्हणाले.
एकदां एक रामदासी मारुती मंदिरात उतरले.श्रीमहारांजाच्या नजरेत आले एकटे पाहून त्यांना विचारले की,तुम्ही वेष कशासाठी घेतला? देवाचें दर्शन व्हावे म्हणून. झाले का दर्शन ?नाही सदगुरू शिवाय नाही होत.मग निघाले सदगुरु भेटावे म्हणून. अंगावरचे वस्त्रे म्हणजे च लंगोटी आणि सदरा.कानात भिकबाळी बस कुठे ही धर्मशाळेत थांबावे. कोणी नमस्कार करावा.कोणी खायला दयावे. दोन तीन मित्र आधी बरोबर होते. नंतर तेही निघून गेले. पुढे चालुन त्यांना कळाले मराठवाड्यात नांदेड पासून काही अंतरावर येहळेगांव आहे तेथे श्री तुकाई महाराज आहे. ते आपले काम करतील.इकडे तुकाई महाराज ओरडून सांगत होते चोर येणार आहे चोरून नेणार आहे. महाराजांची भेट झाली तेव्हा गणपती अंगावर काटे आले होते. भेट होताच मी तुझा जिव घेतो तेव्हा मीपण जीव देता म्हणाले. आणि पुढे अतिशय कठोर परिक्षा घेत श्रीतुकाई च्या मनात बसले.त्यांच्या कसोटीला उतरले.
एकदा श्रीतुकाई नी सांगितले झाडाचे पान तोड तोडली पाने गणपती ने नंतर म्हणाले अरे झाडाला किती त्रास होईल लाव पुन्हा आणि मनात काही ही विचार नकरता लावली पाने. श्रीतुकाई फारच खुश झाले.”शाबास याला म्हणतात आज्ञापालन”पुढे श्रीतुकाई नाही अनुग्रह देऊन पाठवले आधी भारतभर फिरून घरी जा म्हणून सांगितले. त्यांच्या आई आल्या गेल्या ला विचारांची माझा बाळ भेटला का.कसा दिसतो असे म्हणताना सांगितले की दिसायला फार छान आहे. अखंड नाम घेतो.एक दिवस श्रीमहारांज आले आपल्या कोणी ओळखले नाही असे मनात धरुन भिक्षा मागायला दारात आले. आईने विचारले माझे बाळ भेटले का ? कधी येईल हो? तेव्हा श्रीमहारांजाच्या तोंडुन निघाले नामस्मरण करा लवकलच येईल. पुन्हा एकदा कलकत्ता ला गेले हरिहाट केला आणि आपल्या गावाला मारुती च्या मंदिरात उतरले. आईबाबा येऊन घरी घेऊन गेले. आता आले आहे तर लग्नाच्या बेडीत अडकून टाकावे म्हणजे पुन्हा जाणार नाही असे वाटलं पण तसे काही झालं नाही. लग्न झालं काही दिवस राहिले आणि पुन्हा बाहेर पडले. आता बायको मागे लागली तिला घेऊन श्रीतुकाई च्या दर्शन ला गेले.श्रीतुकाई ने नमस्कार केल्यावर काय पाहिजे म्हणताच मला हयांचा सारखा मुलगा पाहिजे म्हणाताच दोघंही हसले. श्रीमहारांज म्हणाले अग हे काय मागितले ते किती मोठ दायला तयार होते तु चुकलीस तीलाही खुपच पश्चाताप झाला पण काही ईलाज नव्हता. मूलगा झाला. बारसं करु दिले नाही. काही दिवसांनी तो गेला.
पुढे इंदोर खुप दिवस होते. वडील गोंदावले येथे गेले इंदोरला त्यांना समजले केस काढून मोकळे झाले.काही दिवसांनी घरी आले. आता कुळकर्णी पद गळ्यात पडले. सारे काही व्यवस्थित चालू होते. आता आई पण गेली. घरात नामस्मरण चालू होते. एक दिवस गावातील लोकांना सांगितले आज आपल्या कडे मोठे पाहुणे येणार आहे तुम्ही वेसिवर जा.मी येतोच.लोकांना कळेना.बाजुच्या गावातील एका माणसाने रामाच्या मुति आणली होती पण काही कारणाने ते घर जळाले जळालेल्या घरात आता मी राहणार नाही मल गोंदावले येथे येऊन सोड म्हणून सारखा आवाज येत होता.त्या माणसाला वाटलं तेथे विठ्ठलाच्या मंदिरात रामाला दयावे म्हणून तो निघाला होता.
आता घरात महाप्रसादाचे आयोजन झाले.1876/1877सालं आले मोठा दुष्काळ पडला.पण श्रीमहारांजाच्या घरी लोकांना भाकरी आणि आमटी खायला मिळायची. श्रीमहारांजाच्या देखरेख खाली दुष्काळ ी कामे करुन घेतली आणि लोकांना जेऊ घातले. औधंचा राजा म्हणाला मी राजा असून मला एवढे अननदान होत नाही हे कोण आहे बघुत.श्रीमहारांजाच्या दशनाला आले.तर माझा रामराया जेऊ घालतो मी काही करत नाही म्हणाले. लोकांनी एक दिवस परिक्षा घेऊन बघुत श्रीमहारांजाच्या घरी लोकांना बोलावले आता बघुत तुमच्या रामाचे कसे जेऊ घालतो.श्रीमहारांज म्हणाले उद्या या आल्या वर फक्त नाम घेणे बाकी काही करायचे नाही.12 वाजले गावातील एकही चुल पेटली नाही. मुलांना भुकेची जाणिव झाली. श्रीमहारांजाच्या समोर फक्त लोक नाम घेत होते. दुपारी 1 वाजता एक गाडी आणि 500लोकांच्या जेवनाचा शिधा होता.श्रीमहारांजाच्या पाया पडुन तो माणूस सांगत होता मला मुलगा झाला की मी रामरायाला नैवेद्य करील असा माझा नवस होता.आणि तो आज पुर्ण होणार आहे. तुमच्या मुळे मला हे घडत आहे. श्रीमहारांज म्हणाले बघत काय बसला उठा नैवेद्य आरती करा.आणि पुरणपोळी चा नैवेद्य झाला.रामराया खंरच नाम घेतले तर तु सर्व करतो.श्रीमहारांजाच्या कडे गुरुत्व आपोआप आले ,कारण गुरू होण्याचींसर्व लक्षणे त्यांच्या अंगी स्वतः सिद्ध होती. श्रीमहारांजानां लौकिकाचा ,प्रसिद्धीचा आणि व्याख्याने अगदी मनापासून कंटाळा होता.
श्रीमहारांजाच्या शिष्य मंडळी त श्रीआनंदसागर,श्रीबहमानंद,आपाभडगांवकर,भाऊसाहेब केतकर,हणमंतराव कुलकर्णी, भयासाहेब मोडक,नीलकंठ लोखंडे, कष्णशात्री उपिनबेटिगिरु,श्रीरामानंद,शिवपाकुळकणी,बळवंत घाणेकर, मनोहर,डॉक्टर कूतकोटी,गणपत दामले, भीमराव गाडगुळी,तात्यासाहेब केतकर,यमुनाबाई केतकर श्रीमहारांजानी पुष्कळ माणसे तयार केली ,सर्वांना नामाला लावले.
शके 1835म्हणजे च 1913 श्रीमहारांजानी शेवटची रामनवमीच्या उत्सवाला सर्वांना आग्रहाने बोलावून घेतलं. प्रत्येक ला सांगत बाळ भगवंताने ज्या परिस्थिती त प्रपंचामधे आपल्याला ठेवले आहे, तिच्या ंत समाधान मानावे पण त्याच्या नामाला कधी ही विसरु नये. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नामघेणाऱ्याचेंरामकल्याण करतो.येवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरुं नका.भगवंताची सेवा एकपरि सोपी आहे. पण गुरु ची सेवा करणे फार कठिण आहे. नाथांनी खरी गुरू ची सेवा केली. कल्याणांनी खरी गुरु सेवा केली.स्पष्ट सांगायचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहींशी झाल्याशिवाय पुर्ण गुरू सेवा घडत नाही. आणि गुरुसेवेत देह झिजल्यावांचुन देहबुद्धी पुर्ण नष्ट होत नाही.
सौ. मंजू विनायक येळणूरकर
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत