महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. लोकसभेमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांवर आणि चांगले कार्य करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. १७ व्या लोकसभेमध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट पाच खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश झाला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा पॅटर्न वेगळ्या पद्धतीने राबविणारे खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभेच्या सर्व कामकाजात सहभागी होत असतात. त्याच यंदाच्या कामगिरीवरून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये शिरकांत शिंदेनी ५५६ प्रश्न सभागृहासमोर मांडले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून, १२ खासगी विधेयके त्यांनी मांडली आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१४ मध्ये लोकसभेत निवडून आलेल्या तरुण खासदारांपैकी एक होते. तसेच ते मोठ्या मताधिक्याने देखील विजयी झाले होते. डॉ. श्रीकांत शिंद हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. संसदरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.