गुजरातमध्ये झालेल्या २००२ मधील गोध्रा हत्याकांडात झाले होते. त्यानंतर तिथे दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार झाला त्यावेळेस त्या गरोदर होत्या. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. गुजरात सरकारने ११ आरोपींना माफ करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. त्याविरुद्ध स्वतः बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच याबाबत काही जनहित याचिका देखील दाखल केल्या गेल्या होत्या. मात्र आता न्यायालयाने हा निर्णय रद्द केला आहे. बिल्किस बानो यांच्या प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती नागरथना म्हणाले, ”भविष्यातील गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देखील जाते, मात्र पीडितेचे दुःख लक्षात घेतले पाहिजे. ”