अयोध्येमध्ये ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे. येत्या २२ जानेवारीला या भव्य मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. देशभरामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या ठिकाणी काही नेते या विषयाचे राजकारण करताना दिसत आहेत. बिहार राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर प्रभू यांनी प्रभू श्रीरामावर केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. जर का लोक आजारी पडले किंवा जखमी झाले तर ते मंदिरात जाण्याऐवजी वैद्यकीय मदत घेतील, अशा प्रकारचे विधान चंद्र शेखर प्रभू यांनी केले आहे.
चंद्र शेखर प्रभू माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ”जर का तुम्ही जखमी झालात तर, तुम्ही कुठे जाल? मंदिर की दवाखान्यामध्ये? जर का तुम्ही शिक्षण हवे असेल आणि तुम्हाला जर का अधिकारी, आमदार, खासदार होयचे असेल तर तुम्ही मंदिरात जाणार की शाळेत?” चंद्रशेखर यांनी ”छद्म हिंदुत्व आणि छद्म राष्ट्रवाद” यांपासून संवाद राहण्याचा सल्ला दिला. सावित्रीबाई फुले यांनी देखील हेच सांगितले होते असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादूर सिंह यांना पाठिंबा दिला. ”राजदचे आमदार फतेह बहादूर सिंह जे बोलले ते सावित्रीबाई फुले यांनी देखील म्हटले होते. येथे काय चुकीचे आहे? त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख यावेळी केला. शिक्षण महत्वाचे नाही का ? आपण आपण छद्म-हिंदुवाद आणि छद्म-राष्ट्रवादापासून सावध राहिले पाहिजे.”
फतेह बहादूर सिंग यांनी शिक्षणाचे कौतुक करताना मंदिरांचा अपमान करणारे पोस्टर्स लावले. ”प्रभू श्रीराम आपल्या सर्वांमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी वास्तव्य करतात, तेव्हा तुम्ही त्यांना शोधण्यासाठी कुठे जाल? ज्या जागांचे वाटप करण्यात आले आहे त्या शोषणाच्या जागा केल्या गेल्या आहेत. ज्याचा उपयोग समाजातील काही षड्यंत्रकारांचे खिसे भरण्यासाठी केला गेला आहे”, असे ते म्हणाले.
सध्या विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीका करताना श्रीरामाबद्दल अहोभाणीय वक्तव्ये करत आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले. तसेच दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी देखील भगवान रामाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.