आयसीसचा दहशतवादी शाहनवाज सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. मागील तीन महिन्यापांसून त्याची कसून चौकशी होत असून त्या दरम्यान शाहनवाज याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आयसीस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना गुजरातमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती तसेच गुजरातमध्ये सिरियल ब्लॉस्ट करण्याचा प्लॅनआखण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा शहनावाजने केला आहे.
गुजरातमधील अनेक मोठी शहरे आयएसआयएसच्या निशाण्यावर होती. शाहनवाज याने दिल्ली पोलिसांना सांगितले की, हँडलर अबू सुलेमान याच्या सांगण्यावरुन दोन दहशतवाद्याने अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत या शहराच्या कानाकोपऱ्याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृह राज्य असल्यामुळे गुजरात राज्यात मोठा हल्ला करण्याची तयारी होती.गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी ISIS ला आपल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून संपूर्ण गुजरातमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडवून आणायचे होते.
त्यासाठी या दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये फिरून रेकीही केली होती असा खुलासाही शहनावाजने केला आहे. अटल प्रवासी पूल याच्यासोबत गर्दीच्या ठिकाणांचे त्यांनी निरीक्षण केले होते.त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, विश्व हिंदू परिषद (विहिप) कार्यालय, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट, सत्र न्यायालय, भाजप कार्यालयाचा दौरा करून तिथले फोटो आणि व्हिडिओ घेतले होते.