दरवर्षी २६ जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या निमित्त दरवर्षी दिल्लीच्या राजपथावर आपल्या सैन्य दलांकडून संचालन केले जाते. तसेच आपल्या लष्करी सामर्थ्याची ओळख देखील दिली जाते. काही कालावधी आधी केंद्र सरकाने अग्नीवर योजना आणली होती. यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना सैन्यात सामील होता येणार आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत महिला अग्नीवीर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संचलनासाठी भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये सहभागी होणार असल्याचे भारतीय वायू सेनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
”आम्हाला एकत्र संचालन करण्याचा तसेच २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाचे सहभागी असल्याचा अभिमान आहे”, अशी पोस्ट भारतीय वायू सेनेने ‘एक्स’ वर केली आहे. अग्निपथ योजना ही सप्टेंबर २०२२ मध्ये लागू करण्यात आली आहे. यामध्य निवड झालेले विद्यार्थी चार वर्षे सशस्त्र दलांमध्ये देशाची सेवा करू शकणार आहेत. त्यानंतर सशस्त्र दलांमध्ये नियमित केडर म्हणून निवडलेल्यांना किमान १५ वर्षांची सेवा देणे आवश्यक आहे.
दरम्यान, यावर्षी संरक्षण दलाच्या दोन महिला तुकड्या प्रजसत्ताक दिनाच्या परेडमध्ये संचालन करणार आहेत. ” १४४ जवानांसह एका सर्व महिला सैनिक असतील, ज्यामध्ये ६० लष्करातील आणि उर्वरित भारतीय वायू सेना आणि भारतीय नौदलातील असतील” असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. या तुकडीमध्ये महिला अग्नीवर सैनिकांचा समावेश असेल ज्या, नौदल आणि हवाई दलामधील असतील. आणखी एक महिला तुकडी जी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयातील असेल. ज्यात लष्करी नर्सिंग सेवांमधील परिचारिकांचा समावेश असेल. या परेडमध्ये या तुकडीचे नेतृत्व महिला डॉक्टर करणार आहेत.
२६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे फ्रान्सचे नेते सहाव्यांदा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महिला शक्तीला प्रोत्साहन देणे किंवा संरक्षण दलांमध्ये महिलांचे सक्षमीकरण करणे हे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख ध्येय आहे.