नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेत.
नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौक, मोकळे भूखंड, क्रीडांगणे, नाले व नदीकिनारी आदी ठिकाणी दि. ५ ते २६ जानेवारी या कालावधीत दररोज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या आहेत. तसेच याकामी शहरातील स्वयंसेवी संस्था, एनएसएस विद्यार्थी यांची मदत घेण्यात येत आहेत. या बैठकीत दिलेल्या सूचनानुसार गत तीन दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- विभागाचे नाव व ठिकाण संकलित केलेला कचरा- दिनांक ५ आणि ६ जानेवारी पंचवटी – आडगाव नाका, औरंगाबाद नाका, मीनाताई ठाकरे स्टेडीयम सर्व्हिस रोड, तपोवन, साई मंदिर परिसर, तपोवन नर्सरी रोड, ६०० टन, २.५०० टन., नाशिकरोड – पुणे रोड, विहितगाव, जय्यौद्दिन डेपो, सिन्नर फाटा. ०.७५० टन ०.८७० टन. नाशिक पूर्व मुंबई नाका हायवे, द्वारका परिसर, दादासाहेब गायकवाड सभागृह, लकी सोसायटी, मिरजकर नगर, काठेगल्ली सिग्नल, नाशिक-पुणेरोड. २.००० टन ३.२५ टन. सातपूर – सातपूर कॉलनी सर्कल ते पिंपळगाव बहुला मुख्य रस्ता, कार्बन नाका भाजी मार्केट, आयटीआय सिग्नल परिसर, महिंद्रा सर्कल ते” मायको कंपनी, एकांत सोसायटी, बापू पूल १.६०० टन ०.९३० टन. नाशिक पश्चिम-सिबल हॉटेल ते एबीबी सर्कल, केबिटी सर्कल ते प्रसाद सर्कल, पाटील परिचय गंगापूर नाका, आकाशवाणी चौक, शहीद सर्कल, गडकरी चौक ते त्रंबक नाका १.३०० टन १.४०० टन. नवीन नाशिक- पाथर्डी फाटा, अंबड लिंक रोड ब्लू क्रॉस, पेलिकन पार्क, आरडी-सर्कल, मयूर हॉस्पिटल मागील परिसर औदुंबर पार्क, नंदिनी नदी किनारा. १.५०० टन २.४०० टन. एकूण ६.७५० टन ११.३५ टन. या मोहिमेकरिता शहरातील सर्व विभागनिहाय समन्वयक अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून मनपाच्या सर्व उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.