India-Maldives Conflict : मालदीवसोबतच्या वादात आता इस्रायल देश भारताच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. भारताचा जवळचा मित्र असलेल्या इस्रायलने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. इस्त्रायलने लक्षद्वीपला भारताचे नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच इस्त्रायलही भारताला यामध्ये मदत करणार आहे.
याबाबतची एक पोस्ट भारतातील इस्रायली दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे. इस्रायलच्या दूतावासाने लक्षद्वीपला नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या प्रकल्पावर काम करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच यावर तातडीने काम सुरू करावे, असेही म्हटले आहे.
https://twitter.com/IsraelinIndia/status/1744286803992150091
इस्रायलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लक्षद्वीपचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या विनंतीवरून आम्ही गेल्या वर्षी लक्षद्वीपमध्ये डिसेलेनाइजेशन कार्यक्रम सुरू केला होता. तर उद्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास इस्रायल तयार आहे. ज्यांनी अद्याप लक्षद्वीपचे सौंदर्य पाहिलेले नाही त्यांच्यासाठी, या बेटाचे मोहक आकर्षण दर्शवणारी काही छायाचित्रे येथे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की डिसेलेनाइजेशन म्हणजे खारट समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवणे. या बाबतीत इस्रायलचे तंत्रज्ञान खूप चांगले आहे.