ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ईडीने धाड टाकली आहे. यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जातात. ईडीने वायकरांशी संबंधित अशा ७ ठिकाणांवर धाड टाकली आहे. यामुळे वायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी भूखंड येथील घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही धाड टाकल्याची बातमी समोर येत आहे.
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू नेत्यांमधील एक अशी त्यांची ओळख आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचे १० ते १२ अधिकाऱ्यांचे पथक सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वायकर यांच्या घरी दाखल झाले आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. ईडीने रवींद्र वायकर आणि त्यांच्या भागीदारांवर धाड टाकली आहे.
मुंबई पालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ सतार हॉटेलचे बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टच्या आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा, पालिकेच्या अख्यतारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावात बांधकाम असे आरोप त्यांच्यावर आहेत.