राज्याच्या अनेक भागांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात अवकाळी पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. सोमवारी कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच कोकणासह, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महारष्ट्रामध्ये सांगली, सातारा , कोल्हापूर तसेच इकडे पुणे जिल्ह्यात देखील सकाळीच पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. पुढील २४ तास कोकणासह राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, देशातील विविध भागांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.