उत्तर प्रदेश एसटीएसने अलिगढ मुस्लिम विद्यापीठात एक मोठी कारवाई केली आहे. एटीएसने ISIS मॉड्यूल स्थापित करण्यात सहभाग असणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. ही कारवाई आयएसआयएसशी संबंधित बेकायदेशीर कृत्य आणि देशविरोधी योजनांबद्दल एटीएसला माहिती मिळाल्यानंतर करण्यात आली आहे. याचा तपास नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरु करण्यात आला होता. एटीएसने अमास उर्फ फराज अहमद आणि अब्दुल समद मलिक या दोन व्यक्तींना अटक केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने जाहीर केलेल्या अधिकृत प्रेसनोटनुसार, अमास ३ नोव्हेंबर रोजी आपल्या साथीदारांच्या अटकेनंतर पळाला होता. मात्र आज त्याला अलिगढ येथून अटक करण्यात आली आहे.
अमासला अटक करण्यापूर्वी त्याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. असेच बक्षीस असलेला अब्दुल समद मलिक याने यापूर्वीच न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. काही लोक आयसिससाठी काम करत असल्याची तसेच देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर एटीएसने ३ नोव्हेंबर २०२२३ रोजी गुन्हा दाखल केला आणि अब्दुल्ला अर्सलान, माझ बिन तारिक आणि वाजिहुद्दीन यांच्यासह सात जणांना अटक केली.
माहितीची खात्री केल्यानंतर आणि ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी ३ नोहेंबर २०२२३ ला लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये आयपीसी १३/२३, कलम १२१ ए / १२२ आयपीसी आणि १३/१८/१८व्ही /३८ बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला. अमास अहमद आणि अब्दुल समद मलिक हे दोघेही एएमयूचे विध्यार्थी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. ते आयएसआयएसचे समर्थक होते आणि मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना ते आखत होते. अमास अंहम्द २०२२ मध्ये AMU मधून मानसशास्त्रात पदवीधर झाला होता. तर २०२३ मध्ये MBA परीक्षेला तो बसला होता. अब्दुल मलिक AMU मध्ये MSW (मास्टर ऑफ सोशल वर्क) शिकत होता.