वर्ल्ड कप 2023 च्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंपासून ते प्रशिक्षकापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. तर आता ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटने मोठे पाऊल उचलले आहे.
पाकिस्तान क्रिकेटने आता तीन प्रशिक्षकांची हकालपट्टी केली आहे. परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, अँड्र्यू पुटीक आणि ग्रँट ब्रॅडबर्न यांच्यापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर या तीन प्रशिक्षकांसोबत बोलणार आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिय कप आणि वर्ल्ड कपनंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. तसेत या तीन प्रशिक्षकांना सांगण्यात आले की, राष्ट्रीय संघात त्यांच्या सेवांची आता आवश्यकता नाही. तसेच पीसीबीने असा निर्णय घेतला आहे की, ते आता राष्ट्रीय क्रिकटे अकादमीमध्ये काम करतील. कारण पीसीबीने मोहम्मद हाफिजची पाकिस्तान संघाचे संचालक आणि नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
तर पुढे अधिकाऱ्याने सांगितले की, मिकी आर्थर हे डर्बीशायरसोबत आहेत आणि अँड्र्यू पुटीक, ग्रँट ब्रॅडबर्न यांना नवीन जाबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही चर्चा झाल्यानंतर कोणताही मतभेद न होता हे प्रकरण संपवले जाईल. तसेच बोर्ड या तिन्ही प्रशिक्षकांनी काही महिन्यांचा पगार भरपाई म्हणून देणार आहे.