नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर असलेला प्रणॉय एचएस हे बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. ही चॅम्पियनशिप 13 ते 19 फेब्रुवारी दरम्यान मलेशियातील शाह आलम येथे पार पडणार आहे.
या चॅम्पियनशिपद्वारे भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूचे पुनरागमन होणार आहे. सिंधू ही मागील चार महिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय सर्किटमधून बाहेर होती. तसेच 16 वर्षीय वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन अनमोल खरब, बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप पदक विजेती तन्वी शर्मा आणि अश्मिता चालिहा या माजी विश्वविजेत्याला महिला एकेरी गटाचे नेतृत्व करणार आहेत.
तर दुसरीकडे, प्रणॉय, ज्याने मलेशिया मास्टर्स 2023 मध्ये त्याचे पहिले BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक आणि BWF वर्ल्ड टूर विजेतेपद देखील जिंकले आहे, तो पुरुष संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन चिराग सेन हे टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी प्रणॉयसोबत असणार आहेत.
तसेच 2023 मध्ये आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकांसह, इंडोनेशिया ओपन 2023 या सुपर 1000 स्पर्धेसह सहा विजेतेपद जिंकल्यानंतर, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी पुरुष दुहेरीची जबाबदारी सांभाळणार आहेत.
भारतीय संघ :
पुरुष संघ: प्रणॉय एचएस, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, चिराग सेन, सात्विकसाईराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टी, ध्रुव कपिला, एमआर अर्जुन, सूरज गोआला, पृथ्वी रॉय
महिला संघ : पीव्ही सिंधू, अनमोल खरब, तन्वी शर्मा, अश्मिता चालिहा, ट्रीसा जॉली, गायत्री गोपीचंद, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रास्टो, प्रिया देवी कोन्जेंगबम, श्रुती मिश्रा.