अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येचे सौरनगरीत रूपांतर करणार आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्येला सौरनगरीत रूपांतरित करण्याच्या दृष्टीकोनाला जगातील सर्वात मोठ्या ‘सौर उर्जेवर चालणाऱ्या स्ट्रीट लाईट लाइन’च्या उपक्रमाद्वारे चालना मिळणार आहे. यामध्ये गुप्तार घाट आणि निर्मली कुंड दरम्यान 10.2 किमी परिसरात 470 सौर पथदिवे बसवण्यात येणार आहेत.
या अनोख्या कामगिरीमुळे अयोध्येची पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. याआधी अयोध्येत दीपोत्सवादरम्यान सर्वाधिक मातीचे दिवे लावण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तर प्रदेश न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (UPNEDA) ने आधीच सुमारे 70 टक्के इंस्टॉलेशनचे काम पूर्ण केले आहे, तर उर्वरित 160 सौर पथदिवे 22 जानेवारीपूर्वी स्थापित केले जाणार आहेत.
याबाबत UPNEDA चे प्रकल्प अधिकारी प्रवीण नाथ पांडे यांनी सांगितले की, अयोध्येत 22 जानेवारीपर्यंत लक्ष्मण घाट ते गुप्तार घाट या 10.2 किमी अंतरावर निर्मली कुंडापर्यंत 470 सौर पथदिवे बसवून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. तर याचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के काम लवकर पूर्ण होणार आहे.
पुढे ते म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत लक्ष्मण घाट ते गुप्तार घाटापर्यंत 310 सौर दिवे बसविण्यात आले आहेत. तर गुप्तार घाट ते निर्मली कुंड दरम्यान 1.85 किमी अंतरावर 160 सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. हे सर्व सौरऊर्जेवर चालणार पथदिवे LED आधारित आहेत, ते 4.4 वॅट्सवर चालतात आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. तर हे दिवे बसविल्यामुळे, लक्ष्मण घाट ते निर्मली कुंडापर्यंतचा 10.2 किमीचा भाग तेजस्वी प्रकाशाने प्रकाशित होणार आहे.
राज्य सरकारचा सौरऊर्जेवर चालणारा प्रकल्प तोडण्याचा जागतिक विक्रम सध्या सौदी अरेबियातील मलहम या नावाने नोंदवला गेला आहे, जिथे 2021 मध्ये 9.7 किमी परिसरात 468 सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवण्यात आले होते. तर आता योगी सरकार अयोध्येत 10.2 किमी परिसरात 470 सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवून हा विक्रम मोडणार आहे.