देशात कोरानाने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. राज्यांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 475 नवीन रूग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 3,919 वर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात जो कोरोनाचा नवीन JN.1 व्हेरियंट आला आहे त्याची 8 जानेवारीपर्यंत 819 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या नवीन व्हेरियंटचा सर्वाधिक प्रभाव हा दक्षिण भारतीय राज्यांमध्ये दिसून येत आहे.
तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, देशात JN.1 व्हेरियंटचा प्रादुर्भाव जास्त आहे पण त्याचा धोका कमी आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोराना रुग्णांची संख्या पाहिली तर महाराष्ट्रात सर्वाधिक 250 रूग्ण आढळले आहेत. तर गोव्यात 49, कर्नाटकात 199, केरळमध्ये 148, दिल्लीत 21, राजस्थानमध्ये 30 आणि हरियाणात 1 अशी रूग्णसंख्या आढळली आहे.
दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, नाक आणि तोंड मास्कने झाका, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.