अयोध्येत येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळ्या देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. जगभरातील अनेक वर्षांपासूनच राम भक्तांचे स्वप्न या दिवशी साकार होणार आहे. अयोध्येमध्ये या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात पीएम मोदींनी आपल्या मंत्र्यांना अत्यंत कठोर निर्देश दिले आहेत. “
“प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्तक राहा.तसेच या सोहळ्यासाठी श्रद्धा दाखवा, मात्र आक्रमकता नको” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे आणि मर्यादेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमा दरम्यान आपल्या मतदारसंघात कुठलीही गडबड होणार नाही, वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घ्या असे त्यांनी बजावले आहे.तसेच भाषणबाजी टाळून शिष्टाचार जपण्याच्या सूचना दिल्या आहेत.