श्रीराम मंदिर प्राणप्रतीष्ठा सोहळ्यात केवळ भारतीयच नाही तर परदेशातील साठ देशातही विश्व हिंदू परिषदेने उत्सवाचे नियोजन केले आहे. मंदीर वही बनायेंगे हा संकल्प आता पुर्ण झाला आहे. आता मंदीर भव्य बनाएंंगेे हा संकल्पही येत्या दोन वर्षात पुर्ण केला जाणार आहे, अशी माहीती विश्व हिंदु परीषदेचे केंद्रीय महामंंत्री मिलींद परांंडे यांनी आज पत्रकार परीषदेत दिली.
परांडे म्हणाले की, या उत्सवांद्वारे, विहिंप सर्वच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन, इंडो-बर्मीज, मंगोलियन आणि युरोपियन देशातील हिंदू सहभागी होणार आहे.दिडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील 355 साधू – संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलें आहे. उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.समाजातील सर्व वर्ग, सर्व भाषा, सर्व जाती, सर्व पंथ, संप्रदाय या सर्वांनी श्रीरामरायांकरिता, त्यांच्या मंदिराच्या निर्मितीकरिता प्रचंड योगदान दिलेलें आहे. पूर्ण विश्वामध्ये श्रीरामांबद्दल आकर्षण दिसून येतं आहे. रामजन्मभूमीच्या विकासासोबतच संपूर्ण अयोध्या शहर आणि त्यातील सर्व तीर्थांच्या उत्कर्षाचं, उत्थानाचं कार्य आज घडून येत आहे. शहराचा व मंदिराचा जो मास्टर प्लॅन बनलेला आहे, त्या सगळ्या दृष्टीने एक श्रेष्ठ तीर्थक्षेत्र या स्वरूपात अयोध्या शहर विकसित होत आहे.23जानेवारी पासुन ंंमंदीर भाविकांना खुले होणार आहे. 27 जानवारी पासुन विहीपचे कार्यकर्ते टप्या टप्प्याने अयोध्येत येणार ओ. माहाराष्टातील दहा हजार कार्यकर्त्यांना नेण्याचे नियोजन केले आहे.21 फेब्रुवारी पर्यंत हे दर्शन होणार आहे. दोन वर्षात तीन मजली मंदीर पुर्ण होणार आहे. सिंमेंट व लोखंडाचा अजीबात वापर नसलेल्या या मंंदीरात दर रामनवमीला राम मूर्तीवर भर दुपारी बाराला सुर्यकिरण पडतील अशी खास व्यवस्था येथे केली आहे.
महाराष्टात 28हजार गावात एकाच वेळी कार्यक्रम करण्याचे नियोेजन पुर्ण झले आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. विहीपला साठ वर्ष पुर्ण होत असल्या बद्द्ल ते म्हणाले की, साठ वर्षात पहीला संकल्प मदीर वही बनाएेंंगेेचा पुण झाला आहे. आता दोन वर्षात भव्य मंंदीराची ही संकल्प पुर्ण होईल. त्याच बरोबर मंंदीरांच ेसरकारीकरण बंद व्हावे. ते निर्बध मुक्त व्हावे,तसेच गोहत्या बंंदी देशभर कठार पणे व्हावी, यासाठा व्ीिहीप भिविष्यात प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लढे देणारआहे असे त्यांंनी स्पष्ट केले.