संरक्षण संशोधन अँड विकास संस्था (DRDO) ने ‘उग्राम’ नावाची स्वदेशी असॉल्ट रायफल लॉन्च केली आहे. ही असॉल्ट रायफल लॉन्च करण्याचा प्रमुख उद्देश सशस्त्र दल, निमलष्करी आणि राज्य पोलीस संस्थांच्या गरजा पूर्ण करणे हा आहे. या असॉल्ट रफळचे कॅलिबर ७.६२ x ५१ मिमी इतके आहे. ही रायफल खाजगी उद्योगाच्या भागीदारीच्या सहकार्याने डिझाईन करून विकसित करण्यात आली आहे.
उग्राम रायफलचे अनावरण पुण्यातील DRDO च्या शस्त्रास्त्र आणि लढाऊ इंजिनिअरिंग सिस्टिम्स मध्ये करण्यात आले आहे. याची मारक क्षमता ही ५०० मित्र इतकी असून, त्याचे वजन हे ४ किलोपेक्षा कमी आहे. आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) च्या एका प्रेस स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे, ”आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) ने खाजगी उद्योगाद्वारे विकसित केलेली 7.62×51 मिमी असॉल्ट रायफल UGRAM चे महासंचालक (आर्ममेंट आणि कॉम्बॅट) डॉ एस व्ही गाडे यांनी लॉन्च केली. यावेळेस अभियांत्रिकी क्लस्टर) ए राजू, संचालक (ARDE), प्रयोगशाळेचे इतर वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि औद्योगिक प्रतिनिधी उपस्थित होते.”