न्यूयॉर्क : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टमाईंड हाफिज सईदबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) मोठा खुलासा केला आहे. हाफिज सईद हा पाकिस्तानच्या ताब्यात असून तो 78 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दिली आहे. हाफिज सईद हा सात दहशतवादी आर्थिक पुरवठा प्रकरणांमध्ये दोषी आढळला होता. याप्रकरणी तो 12 फेब्रुवारी 2020 पासून शिक्षा भोगत आहे.
हाफिज सईद हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आहे. तसेच त्याने एलईटीच्या ऑपरेशनल आणि निधी उभारणीच्या क्रियाकलापांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या सुरूवातीला 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाठी पाकिस्तानला भारताची विनंती प्राप्त झाली होती. मात्र, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणाताही द्विपक्षीय प्रत्यार्पण करार अस्तित्वात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
साप्ताहिक ब्रीफिंगला संबोधित करताना झहार यांनी म्हटले होते की, भारतात हाफिज सईद हा अनेक प्रकरणांमध्ये वॉन्टेड आहे. तो संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेला दहशतवादीही आहे. या संदर्भात, आम्ही संबंधित सहाय्यक कागदपत्रांसह विनंती पाठवली आहे. तसेच पाकिस्तान सरकारला एका विशिष्ट प्रकरणात खटल्याला सामोरे जाण्यासाठी त्याला भारताला सुपूर्द करण्यास सांगितले होते.
17 जुलै 2019 पासून मुहम्मद सईद हा तुरुंगात आहे. इतर आरोपांनुसार त्याला एप्रिल 2022 मध्ये लाहोर, पाकिस्तानमधील विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने “दहशतवादाला आर्थिक पुरवठा” केल्याबद्दल 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
2000 च्या दशकात त्याला युनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियनने दहशतवादी म्हणून नियुक्त केले असूनही, सुमारे दोन दशकांपासून सईदवर आरोप लावले गेले नाहीत किंवा प्रत्यार्पण केले गेले नाही. तसेच डिसेंबर 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सईदला दहशतवादी घोषित केले होते.