पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीवच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या विरोधी पक्षनेते आणि डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष फय्याज इस्माईल यांनी सरकारकडे ”कठोर भूमिका” घेण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वर्णद्वेषी टिप्पण्या निव्वळ आहेत. या लोकांची मते वेगवेगळी आहेत ज्यांना दुर्दैवाने सरकारमध्ये पद देण्यात आले होते. तसेच त्यांनी हे प्रकरण सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे भारताच्या व मालदीवच्या नागरिकांपर्यंत कसे पोहोचले ते अधोरेखित केले.
तसेच फय्याज इस्माईल पुढे बोलताना म्हणाले, ”मी वैयक्तिकरित्या हे मान्य करतो की, यावर कठोर भूमिका घेतली पाहिजे कारण, हे प्रकरण सरकारपर्यंत पोहोचते. आता सोशल मीडियाच्या सहज उपलब्धतेमुळे हे प्रकरण मालदीव व भारताच्या नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. अपमान करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नव्हते हे सरकारने दाखवून दिले पाहिजे. ही केवळ या लोकांची वैयक्तिक मते होती. हे भारतीय, मालदीव आणि संपूर्ण जगाला स्पष्टपणे दर्शविले जाणे आवश्यक आहे.” मोदींवर केलेल्या टीकेमुळे बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला होता. दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या वादाचा भारत-मालदीव संबंधांवर तसेच भारतीय पर्यटकांमुळे राष्ट्राला झालेल्या आर्थिक कमाईवर काही परिणाम होईल याचा देखील विचार केला पाहिजे.
तसेच मंत्री पुढे म्हणाले, ”भारत आणि मालदीव यांच्यामध्ये हे संबंध मोठ्या कालावधीमध्ये अतिशय रिपक्व नेत्यांनी, आमच्या देशाचे यापूर्वीचे नेते आणि तुमच्याद्वारे जोपासले गेले आहेत. एक किंवा दोन ट्विटमुळे हे संबंध खराब होणे अतिशय दुःखद आहे.माझ्यासाठी मुख्य अडचण ही आहे की, हे प्रकरण आता सरकारपर्यंत पोहोचले आहे. सरकारांमध्ये नेहमीच भांडणे होत राहतील; अर्थातच भारतात किंवा मालदीवमध्ये राजकीय पक्ष बदलले तरी मतभेद होतच राहतात. ” मालदीव सरकार त्यांच्या काही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यापासून दूर राहिले आहे. तसेच त्या मंत्र्यांनी केलेले वक्तव्य ही सरकारची भूमिका नाही असे मालदीव सरकारने स्पष्ट केले आहे.